
दिवाळी संपून दोन आठवडे झाले तरी ठाण्यातील अनेक भागांत झाडांवर अजूनही विद्युत माळा झगमगत आहेत. महापालिकेचं याकडे दुर्लक्ष होत असून या कृत्रिम प्रकाशामुळे झाडांच्या श्वसन आणि वाढ प्रक्रियेत अडथळा येतो आहे.
पर्यावरणपूरक ठाण्याचा गवगवा करणाऱ्या पालिकेने आधी झाडांवरील विद्युत रोषणाई काढून संबंधितांवर कडक कारवाई करणे अपेक्षित आहे. अशी मागणी पर्यावरण अभ्यासक प्रशांत सिनकर यांनी केली आहे .