
नवी दिल्लीत झालेल्या स्फोटानंतर देशभर छापेमारी सुरू असून महाराष्ट्रातली कारवायांना वेग आला आहे. महाराष्ट्र एटीएसच्या पथकाने मुंब्र्यात छापेमारी करून दोन जणांची कसून चौकशी सुरू केली आहे. या दोघांकडून इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त करण्यात आल्या असून त्यांचे अॅनालिसिस केलं जाणार आहे. मुंब्र्यातील या कारवाईमुळे एकच खळबळ उडाल्याचं दिसून आलं.
सोमवारी सायंकाळच्या सुमारास नवी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ एक बॉम्ब स्फोट झाला. त्यामध्ये 12 जणांचा जीव गेला आहे. या प्रकरणाचा तपास आता एनआयए करत आहे. त्याच संदर्भात दिवशभर देशातील विविध भागात कारवाई करण्यात आली असून अनेकांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने मुंब्रा परिसरातील चार घरांवर छापेमारी केली. या प्रकरणी एटीएसकडून दोन जणांची कसून चौकशी करण्यात आली. यामध्ये काही इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त करण्यात आल्या असून त्यांचे अॅनालिसिस केलं जाणार आहे.अल-कायदा या दहशतवादी संघटनेचे साहित्य बाळगल्याच्या आरोपावरून एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला पुण्यातून अटक करण्यात आली होती. याच प्रकरणी आता महाराष्ट्र एटीएसने मुंब्रा भागात छापेमारी केली आहे.
* मुंब्रा – कौसा वेळेवेळी संशयाच्या भोवर्यात
इमरान उर्फ मुन्ना भाईचे वास्तव्य ज्या मुंब्य्रात होते तो परिसर दहशतवादी कारवाया संदर्भात वेळोवेळी संशयाच्या भोवर्यात सापडला आहे.याच मुंब्रा कौसा परिसरात २४ ऑगस्ट २००१ रोजी येथून बंदी घातलेल्या सिमी संघटनेच्या सहा हस्तकांना पोलीसांनी अटक केली होती.त्याच वर्षी २० डिसेंबर रोजी संसदेवरील हल्ल्या प्रकरणी कुख्यात अबू हाजमा याला देखिल येथूनाच जेरबंद करण्यात आले होते. १६ मार्च २००२ रोजी मुंब्रा येथिल वफा पार्कवर धाड टाकून पोलीसांनी कुख्यात हिजबुल मुझाउद्दीन या संघटनेच्या चार अतिरेक्यांना बेड्या ठोकल्या होत्या तर १७ एप्रिल २००३ रोजी ठाणे गुन्हे शाखेच्या पोलीसांनी लष्कर ए तोयबाच्या दोन अतिरेक्यांना अटक केली होती.
* साकिब नाचणला मिळायची मुंब्र्यातून मदत
मुलूंड बॉम्बस्फोटा प्रकरणी मोहम्मद नैमुद्दीन या व्यावसायीकाला देखिल मुंब्रा येथूनच १६ मे २००३ रोजी जेरबंद करण्यात आले होते त्याने या बॉम्बस्फोटाचा मुख्य आरोपी कुख्यात साकीब नाचण याला रसायन पुरवल्याचा आरोप होता. त्यानंतर १० ऑक्टोंबर२००३ रोजी भाजपा व संघ परिवाराच्या वरिष्ठ नेत्यांच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी याच परिसरातून तिघांना अटक करण्यात आली होती तर १९९५ पासून भारतात बेकायदा वास्तव्य करणार्या व आयएसआय या पाकिस्तानी संघटनेचा हस्तक असलेल्या मोहम्मद इल्यास जंगली पठाण याला ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने २३ जानेवारी २००४ रोजी जेरबंद केले होते तो देखिल बराच काळ मुंब्रा येथे रहात होता. तसेच गुजरात पोलीसांच्या चकमकीत ठार झालेली इसरत जहॉं शेख ही देखिल याच परिसरातली तिच्यावर लष्कर या कुख्यात संघटनेशी संबधीत असल्याचा आरोप असल्याने तीच्यावरील संशयाचे मभळ अजून कायाम आहे .
* मुंब्र्यातच रहायचा आयएसआयएसचा प्रमुख हस्तक
‘आयएसआयएस’ या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असलेल्या मुंब्र्यातून एका व्यक्तीला २०१६ साली अटक झाली होती हा व्यक्ती ‘आयएसआयएस’ संघटनेचा भारतातील ‘आमिर’ अर्थात ‘प्रमुख’ असल्याचे सांगण्यात आले होते मुंब्रा अमृतनगरमधील रेश्मा अपार्टमेंटमध्ये ३३ वर्षीय मोद्द्ब्बीर शेख हा व्यक्ती पत्नी आणि दोन मुलीसोबत राहत रहायचा त्याचे शिक्षण बी-कॉंम पर्यत तर वेब डिझायनिंगचाही कोर्सही त्याने केला होता. ‘आयएसआयएस’ या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आला आणि या संघटनेच्या संपर्कात होता त्याला बॉंम्ब बनवण्याचे प्रशिक्षण ऑनलाईन मिळाले होते. असे आरोप आहेत . २००९ पासून कळवा मुंब्रा विधानसभा मतदासंघाचे प्रतिनिधित्व आमदार जितेंद्र आव्हाड हे करत असून या काळात मुंब्र्यात बऱ्यापैकी शांतता आहे तसेच काही किरकोळ अपवाद वगळता या परिसरातून अतिरेकी कारवायांना पाठबळ मिळत असल्याचे आरोपही झालेले नाहीत मात्र दिल्ली बाँबस्फोट प्रकरणी मुंब्र्यात चार घरांवर छापेमारी झाल्याने हा परिसर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे .