* शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली सखोल चौकशीची मागणी
पुण्यातील कोरेगाव पार्क येथील सरकारी जमीन खरेदीमुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे चांगलेच अडचणीत आले आहेत. काँग्रेसमधील विविध नेत्यांकडून या प्रकरणावरून पार्थ पवार यांच्यासह अजित पवारांना टार्गेट केले जात आहे. मात्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सु्प्रिया सुळे यांनी पार्थ पवारांची पाठराखण केली होती मात्र आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी हे प्रकरण गंभीर असून थेट मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी केली असल्याने पार्थ पवारांच्या अडचणीत वाढ झाली आहे .
शरद पवार यांनी म्हटलं की, “पुण्यातील जमीन व्यवहाराचे प्रकरण गंभीर असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. एखादी गोष्ट गंभीर असल्याचं मुख्यमंत्री सांगत असतील तर त्याबाबत चौकशी करून वास्तव चित्र त्यांनी समाजासमोर ठेवलं पाहिजे. त्यामुळे ते काम त्यांनी करावं, अशी आमची अपेक्षा आहे,” असं पवार म्हणाले. ते अकोला येथील पत्रकार परिषदेत बोलत होते .
दरम्यान, कुटुंबातील एका सदस्यावर जमीन गैरव्यवहाराचे आरोप झाल्याबद्दल पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. मात्र “प्रशासन, राजकारण, कुटुंब आणि कुटुंबप्रमुख या गोष्टींमध्ये फरक आहे. कुटुंबप्रमुख म्हणून म्हणाल तर आम्ही एकमेकांविरुद्ध निवडणुका लढवल्या आहेत. माझा एक नातू हा अजित पवारांविरोधात उभा होता. अजित पवारांची पत्नी माझ्या मुलीविरोधात निवडणुकीत उभी होती,” असं पवार यांनी स्पष्ट केलं आहे