
ठाणे – राष्ट्रवादी महिला काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या ठाणे जिल्हाध्यक्षपदी नगरसेविका मनिषा भगत यांची तर कार्याध्यक्षपदी साबिया मेमन आणि फुलबानो पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सुजाताताई घाग यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्याने राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या सुचनेनुसार, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या ठाणे महिलाध्यक्षपदी मनिषा भगत, कार्याध्यक्षपदी साबिया मेमन व फुलबानो पटेल यांची नियुक्ती केली आहे.
मनिषा भगत यांची आक्रमक चेहरा अशी ओळख आहे. नुकत्याच झालेल्या ठाणे महानगर पालिकेच्या निवडणुकीत त्या प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. तर साबिया मेमन आणि फुलबानो पटेल या राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या सक्रीय कार्यकर्त्या असून पक्षाच्या विविध आंदोलन, उपक्रमांमध्ये त्या हिरीरीने सहभागी होत असतात.
मनिषा भगत, साबिया मेमन आणि फुलबानो पटेल यांच्या नियुक्तीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाची ताकद अधिकच वाढणार असून महिला विंग अधिक सक्षम होणार असल्याचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी सांगितले.
दरम्यान, या नियुक्तीनंतर सुप्रिया सुळे, फौजिया खान, डाॅ.जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे, रोहिणी खडसे, मनोज प्रधान यांचे आभार मानून, ठाणे शहरातील महिला सुरक्षा आणि महिलांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण आक्रमक भूमिका घेणार आहोत. ठाणे महानगर पालिकेच्या सभागृहात तसेच सभागृहाबाहेरही महिलांच्या प्रश्नांवर आपण लढणार आहोत, असे मनिषा भगत यांनी सांगितले.