
* नगर अभियंता प्रशांत सोनाग्राच्या गाडीत सुरु होती पार्टी
ठाणे : ठाणे महापालिका मुख्यालयाच्या आवारातच नगर अभियंता प्रशांत सोनाग्राच्या गाडीत खुलेआम दारुपार्टी सुरु होती , काही जागरूक पत्रकारांच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी या पार्टीचे चित्रीकरणही केले आहे . विशेष म्हणजे ज्या पालिकेच्या गाडीत हा प्रकार सुरु होता त्या गाडीचा चालक भरधाव वागणे गाडी मुख्यालयाबाहेर घेऊन गेला या दरम्यान महापालिकेच्या गेटलाही गाडी घासली यामुळे कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या जीवालाही धोका निर्माण झाला होता . दरम्यान या प्रकारामुळे महापालिकेची सुरक्षा व्यवस्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे .
महापालिका मुख्यालयात पालिकेचे पदाधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या गाड्या उभ्या असतात त्यापैकी एमएच ०४ केयू २३२३ ही पालिकेचे नगर अभियंता प्रशांत सोनग्रा यांची कार लागलेली होती आणि चालक आणि अजून एक इसम भरदिवसा उघडपणे गाडीतच बियर पित बसले होते हा प्रकार तिथून जाणाऱ्या काही पत्रकारांच्या लक्षात येताच त्यांनी या प्रकारचे चित्रीकरण केले विशेष म्हणजे सोनग्रा यांना पालिकेने गाडी दिलेली असताना ते भाड्याने गाडी घेऊन वापरात असल्याचे उघडकीस आले आहे . जी भाड्याची गाडी आहे त्या गाडीचा चालक पालिकेच्या गाडीत बसून बिअर पित बसला होता. या प्रकरणाची सर्व माहिती पत्रकारांनी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांना तत्काळ दिली . दरम्यान हा सर्व प्रकार पालिका मुख्यालयातील सीसी टीव्हीत चित्रित झाला असल्याने नगर अभियंता सोनग्रा आणि त्यांच्या चालकांवर कोणती कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .