
तीन वर्षांनी नवऱ्यासह चौघांवर हत्येचा गुन्हा दाखल
ठाणे : बायकोच्या सततच्या त्रासाला कंटाळून नवऱ्यानं विषारी साप घरात सोडून बायकोची शांत डोक्याने हत्या केल्याचे खळबळजनक प्रकरण बदलापुरात उघडकीस आले आहे . विशेष म्हणजे हा प्रकार तीन वर्षांपूर्वी घडला होता . बदलापूर पूर्वेतील आंबेकर इस्टेट सोसायटीत रुपेश आंबेकर हा पत्नी नीरजा हिच्यासह रहात होता .
10 जुलै 2022 रोजी रात्री 10 वाजताच्या सुमरास उज्वलदीप सोसायटीत तळ मजल्यावर घरात बायकोला विषारी सर्पदंश करून ठार मारलं. त्यानंतर पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद करून तपास सुरु केला. “आरोपी ऋषिकेश चाळके यानं पोलिसांना दिशाभूल करणारं निवेदन दिलं. तर दोन साक्षीदार हरीश घाडगे, दीपक वाघमारे यांनी दिलेला जबाब, या सर्वांची कसून चौकशी केली. पोलीस तपासात चार आरोपींनी कट रचून नीरजा हिला विषारी सर्पदंश करून ठार मारल्याचं निष्पन झालं. घडली होती. या प्रकरणी तीन वर्षाच्या पोलीस तपासानंतर बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात हत्येसह पुरवा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी नवऱ्यासह चार जणांना अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी दिली आहे. रुपेश सतीशचंद्र आंबेकर (नवरा, वय 40 ), ऋषिकेश रमेश चाळके ( रा. आपटेवाडी , बदलापूर), कुणाल विश्वनाथ चौधरी (वय 25 , रा. म्हाडा कॉलिनी, सद्गुरु बंगला, बदलापूर ) आणि सर्पमित्र चेतन विजय दुधाने (वय 36, रा. गणेशनगर, बदलापूर ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत.
बायकोच्या त्रासाला कंटाळून सोडला साप
: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रुपेश आंबेकर याचा विवाह नीरजा हिच्याशी झाला होता. तो बदलापूर पूर्वेतील आंबेकर इस्टेटमधील उज्वलदीप सोसायटीत तळ मजल्यावर बायको सोबत राहत होता. मात्र विवाहानंतर काही महिन्यानं नवरा बायकोमध्ये घरगुती कारणावरून वाद होत होते. याच वादातून आरोपी नवरा बायकोच्या मानसिक त्रासाला कंटाळला होता. त्यानंतर आरोपी मित्र ऋषिकेश आणि कुणालच्या मदतीनं बायकोला संपवण्याचा कट रचला. त्यासाठी त्यानं सर्पमित्र आरोपी चेतनलाही कटात सामील करून घेतलं.कट रचल्याप्रमाणं 10 जुलै 2022 रोजी रात्री 10 वाजताच्या सुमरास उज्वलदीप सोसायटीत तळ मजल्यावर घरात बायकोला विषारी सर्पदंश करून ठार मारलं
तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा दाखल
: याप्रकरणी ११ डिसेंबरला पोलीस निरीक्षक अनुकूल दोंदे यांच्या तक्रारीवरुन बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात कलम 302, 201, 182, 120 (ब ) प्रमाणं गुन्हा दाखल करून आरोपी नवऱ्यासह चार जणांना अटक करण्यात आली,” अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी दिली आहे. आज १२ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास चारही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले .