
* २०१७ साली बहुतांशी प्रभागात शिवसेनेच्या विरोधात दुसऱ्या क्रमांकावर होते भाजप उमेदवार
* जिथे भाजप जिंकला तिथे थोड्या फरकाने हरलेत सेनेचे उमेदवार
ठाणे : प्रमोद खरात
केंद्रात आणि राज्यात भाजप , शिवसेना शिंदे गट , राष्ट्रवादी अजित पवार गट यांची सत्ता असली तरी नुकत्याच झालेल्या नगरपालिका नगरपरिषद निवडणुकीत बहुतांशी ठिकाणी हे तिन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले भाजपणे काही नगरपालिकांचे नगराध्यक्ष आणि शेकडो नगरसेवक बिनविरोध निवडूण आणले , अजून या निवडणुकांचे निकाल जाहीर व्हायचे आहेत मात्र त्यापूर्वीच येणाऱ्या महापालिका निवडणुका महायुती एकत्रित लढणार असल्याची घोषणा दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी केली आहे . परंतु २०१७ च्या निवडणुकांचा निकाल पहाता महायुती एकत्रित कशी लढणार असा प्रश्न निर्माण झाला आहे .
२०१७ च्या महापालिका निवडणुकीत ज्या ६७ जागा एकत्रित शिवसेनेने जिंकल्या त्यातील काही किरकोळ अपवाद वगळता सर्व माजी नगरसेवक शिवसेना शिंदे गटात गेले आहेत हे सत्य आहे मात्र तेव्हा जे जिंकले होते त्याच्या विरोधात बहुतांशी प्रभागात दुसऱ्या क्रमांकावर भाजपचे उमेदवार होते , ज्या २३ जागा भाजपने जिंकल्या होत्या त्यांच्या विरोधात बहुतांशी प्रभागात एकत्रित शिवसेनेचे उमेदवार होते कळवा मुंब्रा , राबोडी आणि लोकमान्य नगर हा परिसर एकत्रित राष्ट्रवादीच्या प्रभावाखाली होता तर शहरात इतरत्र शिवसेना विरोधात भाजप अशीच लढत झाली होती .
कोणत्याही क्षणी महापालिका निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे त्यातही एकत्रित निवडणूक लढवण्याची घोषणा महायुतीच्या नेत्यांनी केली आहे मात्र शिवसेना शिंदे गट , भाजप आणि राष्ट्रवादी अजितदादा गट यांच्यात जागावाटप कसे होणार हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे . जेवढ्या जागा जिकंलेल्या आहेत तेवढ्या त्या पक्षांना द्याव्या लागणार , म्हणजे शिंद गट किमान ७० ते ८० , भाजप किमान ४० ते ५० आणि राष्ट्रवादी किमान ४० असे जागावाटप करावे लागणार आहे , पालिकेत एकूण १३१ जागा आहेत त्यातही जे दुसऱ्या क्रमांकावर कमी मतांनी हरले आहेत त्यांना नागरसेवकपदाची स्वप्ने पडू लागली असताना जागावाटप कसे करायचे हा मोठा प्रश्न महायुतीपुढे असणार आहे .
* बहुतांशी प्रभागात शिवसेना विरुद्ध भाजप
२०१७ च्या निवडणुकीत एकत्रित शिवसेनेने ज्या ६७ जागा जिंकल्या त्यातील किमान ४५ जागांवर भाजपचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते तर भाजपने ज्या २३ जागा जिंकल्या त्यातील १९ जागांवर शिवसेनेचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते राष्ट्रवादीने ज्या ३४ जागा जिंकल्या त्यातील २० जागांवर शिवसेना १० जागांवर भाजप तर इतर ठिकाणी काँग्रेस उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते .
* थोड्या मतांनी जिंकलेले उमेदवार
शिवसेनेच्या मीनाक्षी शिंदे प्रभाग ३ मधून जिंकल्या तेथून भाजपच्या दीपमाळा मढवी अवघ्या १६०० मतांनी पराभूत झाल्या , याच प्रभागातून शिवसेनेचे भूषण भोईर जिंकले आहेत मात्र भाजपचे रमाकांत पाटील अवघ्या ९०० मतांनी हरले आहेत , लगतच्या प्रभाग ४ मधून भाजपचे मुकेश मोकाशी जिंकले आहेत परंतु शिवसेनेचे हरिश्चन्द्र पाटील १३०० मतांनी हरले आहेत , प्रभाग ११ मध्ये भाजपच्या दीपा गावंड यांनी सेनेच्या महेश्वरी तारे यांचा अवघ्या ८०० मतांनी पराभव केला आहे . याच प्रकारे भाजपचे अशोक राऊळ २०० , शिवसेनेच्या नम्रता पमनानी ८०० , पल्लवी कदम ७० , सुधीर कोकाटे ११०० , अनिता पाटील ९०० आणि अमर पाटील ६२० मतांनी जिंकले आहेत .