
थॅलेसेमिया रुग्णांसाठी अंदाजे 365 रक्ताच्या बाटल्यांचे संकलन
समाज आरोग्य आणि कल्याणासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवणाऱ्या टोरेंट पॉवर कंपनीतर्फे शनिवार, 29 नोव्हेंबर रोजी त्यांच्या भिवंडी आणि शील-मुंब्रा-कलवा (SMK) परिसरात मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कंपनीच्या समुदाय सेवा उपक्रमांचा एक भाग म्हणून घेण्यात आलेल्या या शिबिराचा मुख्य उद्देश थॅलेसेमिया रुग्णांना रक्ताची मदत करणे हा होता.
कंपनीच्या सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेतल्यामुळे एका दिवसात ३६५ रक्ताच्या बाटल्यांचे संकलन करण्यात यश आले. संकलित रक्त भागीदार रक्तपेढ्यांना देण्यात आले, ते थॅलेसेमिया तसेच इतर गंभीर रुग्णांच्या उपचारांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
या उपक्रमाला टोरंट पॉवर कर्मचाऱ्यांनी अतिशय उत्साहपूर्ण प्रतिसाद दिला. अनेकांनी असे सांगितले की अशा सामाजिक उपक्रमात सहभागी होताना त्यांना मनापासून समाधान मिळते आणि नियमितपणे समाजोपयोगी कार्यक्रम राबवणाऱ्या संस्थेचा ते एक भाग असल्याचा त्यांना अभिमान वाटतो.
टोरेंट पॉवरच्या जनसंपर्क अधिकारी यांनी सांगितले, टोरेंट पॉवर ही फक्त विजपुरवठा सेवा देणारी संस्था नाही; आम्ही समाजहितासाठी कार्य करण्यास तितक्याच गांभीर्याने वचनबद्ध आहोत. थॅलेसेमिया रुग्णांसाठी आयोजित या रक्तदान शिबिरात कर्मचाऱ्यांचा प्रचंड सहभाग पाहून आम्हाला अत्यंत आनंद झाला.”
टोरेंट पॉवर वर्षभरात आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि समाजविकासाशी संबंधित विविध उपक्रम राबवत असते. समाजावर सकारात्मक आणि शाश्वत परिणाम घडवण्याच्या आपल्या ध्येयाशी कंपनी कटिबद्ध आहे.