
* भाजप शिंदेसेनेचे भांडण महाविकास आघाडीच्या पथ्यावर
ठाणे : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकामध्ये काही ठिकाणी आरक्षणाची ५० टक्के मर्यादा ओलांडल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायलयात शुक्रवारी सुनावणी झाली . न्यायालयाने निवडणूक घेण्यास कोणतेही निर्बंध घातलेले नसल्याने महापालिका निवडणूक येणाऱ्या जानेवारी महिन्यात होणार हे जवळपास स्पष्ट झाले असल्याने
थंडीच्या दिवसातच राजकीय वातावरण तापायला सुरवात होणार आहे . विशेष म्हणजे ठाणेदार होण्यासाठी शिंदेसेना आणि भाजप यांच्यातच मुख्य लढत होणार असली तरी या दोन मित्रांचे भांडण महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे , मनसे , राष्ट्रवादी शरद पवार आणि कोंग्रेस यांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता दिसू लागली आहे .
करोना काळ तसेच विविध तांत्रिक कारणांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका गेल्या चार वर्षापासून रखडलेल्या आहेत. राज्यात सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार प्रशासकांमार्फत गेले काही वर्षे सुरू आहे. सर्वोच्च न्यायलय आणि निवडणुक आयोगाच्या आदेशानंतर राज्य निवडणुक आयोगाने निवडणूकीची तयारी सुरू केली. नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला असून याठिकाणी निवडणुक प्रचाराला सुरूवात झाली आहे. या निवडणुकांनंतर जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात होती. त्यानुसार जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुक विभागाने प्रभाग रचना अंतिम करत आरक्षण सोडत प्रक्रीयाही उरकली आहे. मात्र, या आरक्षण सोडत प्रक्रीयेत काही ठिकाणी आरक्षणाची ५० टक्के मर्यादा ओलांडण्यात आल्याचा – दावे केले जात असून हे प्रकरण सर्वाच्च न्यायालयात दाखल झाले . त्यावर सर्वोच्च न्यायलयात शुक्रवारी सुनावणी झाली असून न्यायालयाने कोणत्याही निवडणुकीला सतहगिती दिलेली नाही .
विशह महणजे ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी झालेल्या आरक्षण प्रक्रियेत आरक्षणाची टक्केवारी ३६ टक्क्यांच्या आत असल्याचे समोर आले आहे. ठाणे महापालिकेत ३३ प्रभागातून एकूण १३१ नगरसेवक निवडूण जाणार आहेत. ३३ पैकी ३२ प्रभाग हे चार सदस्यीय असून १ प्रभाग तीन सदस्यीय आहे. १३१ पैकी ४७ जागा अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आल्या असून त्याची आरक्षण सोडत पार पडली आहे. एकूण १३१ नगरसेवक संख्येच्या तुलनेत केवळ ४७ जागांवर आरक्षण देण्यात आलेले असून त्याची टक्केवारी ३६ टक्क्यांच्या आत असल्याने ठाणे पालिके संदर्भात राखीव जागांची मर्यादा
घटनेच्या चौकटीत असल्याचे यापूर्वीच घड झाले आहे .
* निवडणूक २०११ च्या जनगणनेनुसार
ठाणे महापालिकेची निवडणुक २०११ च्या जनगणनेनुसार होणार असून यानुसार, शहराची एकूण लोकसंख्या १८,४१,४८८ इतकी आहे. त्यामध्ये अनुसूचित जातींची लोकसंख्या १,२६,००३, अनुसूचित जमातींची लोकसंख्या ४२,६९८ इतकी आहे. राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे, महापालिकेच्या एकूण १३१ पैकी, अनुसूचित जातींसाठी ९ जागा, अनुसूचित जमातींसाठी ३ जागा, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी ३५ जागा आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी ८४ जागा आरक्षित केलेल्या आहेत. एकूण १३१ जागांपैकी महिलांसाठी ६६ जागा आरक्षित आहेत.
* ठाण्यात भाई विरुद्ध दादा
शिंदेंची शिवसेना आणि भाजपने शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) व काँग्रेस, मनसेतील मंडळींना गळाला लावण्याची चढाओढ गेल्या काही महिन्यापासून सुरू केली आहे. यामध्ये प्रथमदर्शनी शिंदे गटाने बाजी मारल्याचे दिसते. शिंदेंना त्यांच्याच घरच्या मैदानावर घेरण्यासाठी भाजपने रणनीती आखली आहे. त्याची जबाबदारी वनमंत्री गणेश नाईकांवर सोपवली असल्याने ‘भाई’ विरुद्ध ‘दादा’ असा कलगीतुराही चांगलाच रंगला आहे . नाईक यांच्या जनता दरबाराने शिदि गटाची झोप उडवली. त्याला प्रतिउत्तराचा प्रयत्न शिदि गटाकडून झाला, पण फारसे यश मिळाले नाही. त्यामुळे पक्षप्रवेशांचा धडका लावत शिंदे गटाने आपली ताकदवाढीस सुरुवात केली आहे. पण भाजपनेही शांततेत आपले ‘ऑपरेशन’ सुरू केल्याची चर्चा आहे. त्यासाठी संघाची मोठी फळी कामालाही लागली आहे.ठाण्यात भाजप आणि शिंदेगट यांची युती झाली तर दोन्ही पक्षात मोठ्या प्रमाणात बंडखोरी होवू शकते त्यामुळे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढतील असे सांगण्यात येत आहे मात्र हे दोन पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले तर काही मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही .