
नवी मुंबई : दंतशल्यचिकित्सा क्षेमातील नामांकित डॉ. उल्हास वाघ येना नुकतेच नेरुळ , नवी मुंबई येथील डी. वाय. पाटील विद्याश्रीठ परिसरात झालेल्या ३६ व्या राष्ट्रीय पातळीवरील विशेषतज्ञ परिषदेत इंडियन अँकेडमी ऑफ ओरल मेडिसिन अँड ن रेडियोलॉजी या संस्थेच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ. उल्हास वाघ गेली ४५ वर्षे अव्याहतपणे रुग्णसेवा देत आहेत. भिवंडी येथील लैंगिक व्यावसायिक महिलांसाठी त्यांनी ‘साथी प्रकल्प ‘ यशस्वीपणे दहा मे वर्षे राबविला. ज्या योगे त्या उपेक्षित महिलांमधील गुप्तरोग तसेच एचआयव्ही /एड्सचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी करून त्यांना निरोगी जीवन प्रदान करण्यात त्यांचा मोलाना वाटा आहे. त्यांच्या कामाची दखल युएनएफपीए, युएसएड, युनिसेफ, तसेच जागतिक आरोग्य संघटनेने घेतली असू त्यांचे कार्य सदर महिलांचे सबलीकरण व त्यांच्या मुलांच्या
शिक्षणासंदर्भात अजूनही चालू आहे.
आपल्या देशात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थानमा सेवनामुळे मुख कर्करोग होणाचे प्रमाण सर्वात आस्त आहे. त्यामुळे गेली 36 वर्षे डॉ. वाघ तंबाखु विरोधी मोहिम यशस्वीरित्या राबवीत आहेत.
आपल्या वाहनामध्ये फिरते डेंटल क्लिनिक धापल्या सहकाऱ्यांसह आदिवासी पाडे, वृद्धाश्रम , मतीमंद मुले, तसेच तळागाळातील गरजू लोकांसाठी दंत वैद्यकीय सेवा पुरवित आहेत. कोविड काळात सुद्धा एकही दिवस विश्रांती न घेता गरजू रुग्णांना अत्यावश्यक सेवा दिली आहे. डॉ उल्हास वाघ यांना राष्ट्रीय पातळी वरील जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान झाल्याने सर्व स्थरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.