
विद्यार्थी गुणगौरव, समाजभूषण पुरस्कार वितरणाने कार्यक्रमाला उजाळा
बदलापूर : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त २०२५ मध्ये संपूर्ण देशभरात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यांच्या कार्याची, समाजासाठी केलेल्या सेवाभावाची गौरवपूर्ण आठवण या निमित्ताने सर्वत्र करण्यात येत आहे. महाराष्ट्र सरकारसह विविध संस्था, राजकीय पक्ष व समित्यांनी राज्यभर विविध उपक्रम राबवले.या निमित्ताने ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात सकल धनगर समाज, बदलापूर-ठाणे जिल्हा यांच्या वतीने नुकताच एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात विद्यार्थी गुणगौरव, सेवानिवृत्ती सन्मान तसेच समाजभूषण पुरस्कार प्रदान करून जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाला बापूसाहेब हटकर,रुपेश थोरात,यशपाल भिंगे,प्रकाश चऱ्हाटे,शंकर कोळेकर,वसंत देवकाते,शंकर लबडे,संदीप माने,संदीप पांढरे,सुमित लोखंडे, डोंगरसिंग गढरी तसेच अपर्णा परदेशी यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानेश्वर भाऊ परदेशी यांच्या प्रास्ताविकाने झाली. धनगर इतिहासकार बापूसाहेब हटकर यांनी समाजाला मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रकाश चऱ्हाटे व शंकर लबडे यांनी मनोगत व्यक्त करत समाजकार्यातील एकात्मतेचे महत्त्व अधोरेखित केले . अपर्णा परदेशी यांनी कविता सादर करत उपस्थितांचे लक्ष वेधले. तसेच कु. निर्वी गणेश गढरी हिनेही आपले मनोगत व्यक्त केले.
समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले.यात समाजसेवक शंकर लबडे,उद्योजक रुपेश थोरात, गड किल्ले अभ्यासक सुमित लोखंडे, शैक्षणिक कार्यकर्ते दुर्योधन देवकाते, GST अधिकारी रोहित मारकड,लेखिका-कवयित्री अपर्णा परदेशी, गायक-लेखक-संगीतकार मुकेश धनगर,समाजसेवक सागर डोंगरसिंग गढरी,माजी शिक्षणाधिकारी प्रकाश चऱ्हाटे, उद्योजक सुभाष वरखडे, व्यावसायिक युवराज अघडते, शो डायरेक्टर अनंता गिल्ले, ट्रस्टी पंढरीनाथ बाविस्कर, मुंबई अग्निशमन दलातील अधिकारी सुखदेव सरगर,महावितरण अधिकारी रवींद्र फकीरा परदेशी व संदीप पांढरे यांचा समावेश होता.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ज्ञानेश्वर भाऊ परदेशी, महेश दिनवले, दुर्योधन देवकाते, सुधाकर ठोके, गणेश गढरी,विजय मनोरे, इंद्रजीत भदे, सुभाष वरखडे, राजेंद्र धोंडू गढरी, डोंगरसिंग आबा परदेशी, श्री रोंडाळे, धनराज बकले तसेच विनोद धनगर, सोमनाथ हुलगे, गोविंद खांडेकर यांनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाला बदलापूर परिसरातील धनगर समाजाचे मोठ्या संख्येने सहकार्य लाभले. याबद्दल सुधाकर ठोके यांनी उपस्थितांचे आभार मानले.