
* भाजपा मंडळ अध्यक्षांचा बंडखोर सूर
* सर्व १८ मंडळ अध्यक्षांचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
ठाणे : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा दिवस काही तासांवर आलेला असताना केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या महायुतीत ठाण्यात मात्र पहरसे आलबेल असल्याचे चित्र नाही . वरिष्ठ नेत्यांनी महायुतीत लढण्याचा निर्णय घेतलेला असताना भाजपच्या कार्यकर्त्यांचा मात्र एकत्र लढायला विरोध असून ठाण्यात भारतीय जनता पार्टीच्या सर्व १८ मंडळ अध्यक्षांनी एकत्र येऊन शिवसेना–भाजप युतीविरोधात उघड भूमिका घेतली आहे.त्यांनी तसे पात्रच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे .
त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात “ठाण्यात शिवसेनेसोबत युती नको”, २०१७ भाजपाची ताकद ठाण्यात वाढली आहे”, “ठाण्यात जनतेला भाजपचा महापौर हवा आहे”, “युतीच्या निर्णयाचा फेरविचार करावा”अशी मागणी केली आहे .
ठाणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी व शिवसेना (शिंदे गट) यांच्यात युती होणार असल्याची चर्चा सर्व माध्यमांमधून समोर येत आहे. पक्षश्रेष्ठी व वरिष्ठ नेत्यांनी घेतलेल्या या युतीच्या निर्णयामुळे स्थानिक ठिकाणी पक्षामध्ये वाढते असंतोष व कार्यकर्त्यांची भावना पाहता युती न केल्यास कार्यकत्यांना सर्व ठिकाणी लढायला मिळेल, अशी भावना आम्ही तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने मांडत आहोत.संपूर्ण ठाणे महानगरपालिकेच्या मतांचे समीकरण पाहिले असता एकूण मतदान 2885228 मतदान झाले होते त्यापैकी शिवसेना 1020438 म्हणजे 35% व भारतीय जनता पार्टी 718197 म्हणजे 25% एवढे मतदान घेतले होते म्हणजे आपल्याला त्यावेळेस फक्त 10 % ही मते कमी पडली होती व आज रोजी आपण केलेल्या कामाच्या जोरावर ठाणे महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा वोटिंग रेशो नक्कीच वाढला आहे. तसेच 2017 ते 2025 ह्या कालावधीत नवीन मतदार देखील वाढलेला आहे व या वाढलेला मतदार हा भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेशी जोडलेला मतदार आहे, ह्यास्तव, ठाणे शहरातील आम्हा सर्व १८ मंडल अध्यक्षांचे एकमताने असे मत आहे की, युतीबाबत असणारा निर्णय मागे घ्यावा यामुळे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढेल व पक्षाची दीर्घकालीन वाढ सुनिश्चित होईल, असा आम्हाला विश्वास आहे. ही भूमिका आम्ही कोणाच्याही विरोधात घेत नसून, केवळ भारतीय जनता पार्टीच्या बळकटीसाठी, स्वबळावर निर्णय घेण्याच्या क्षमतेसाठी आणि ‘गल्ली ते दिल्ली’ पक्ष अधिक सक्षम व्हावा, या उद्देशाने करीत आहोत.
* भाजपचे बळ मोठ्या प्रमाणात वाढले आहे
सन 2017 च्या 33 प्रभाग मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकी पासून आज 2025 पर्यंतच्या दीर्घ कालावधीत अनेक राजकीय व सामाजिक घडामोडी घडल्या असून त्याचा थेट परिणाम ठाणे शहरातील राजकीय समीकरणांवर झाला आहे. २०१७ च्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे २३ नगरसेवक व शिवसेनेचे ६७ नगरसेवक निवडून आले होते. परंतु पुढील 9 वर्षांच्या या कालखंडात जनमतामध्ये लक्षणीय बदल झाला आहे, असे आम्हाला कार्यकर्ते म्हणून प्रत्यक्ष अनुभवास येत आहे. तसेच 2014 नंतर देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीने विविध विकास कामांच्या जोरावर भारतभर आपली पक्षाची पकड़ मजबूत केली आहे तसेच आपले सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व महाराष्ट्राचा बुलंद आवाज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पक्ष वाढीसाठी केलेली मेहनत व महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास या जोरावर ठाणे महानगरपालिकेतील सर्व साधारण नागरिकांना आज केंद्रात व राज्यात जसे भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे, त्याचप्रमाणे ठाण्यात देखील भारतीय जनता पार्टीचा महापौर बसला पाहिजे ही भावना आहे. तसेच भारतीय जनता पार्टींचे नेते वनमंत्री गणेशजी नाईक साहेब यांनी ठाणे शहरात सुरू केलेल्या जनता दरबाराच्या माध्यमातून असंख्य ठाणेकरांचे प्रश्न मार्गी लागले. तसेच ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयजी केळकर साहेब व विधानपरिषद आमदार निरंजनजी डावखरे यांच्या ‘जनसेवकाचा जनसंवाद’ या उपक्रमामुळे तसेच ठाणे महानगरपालिका क्षेत्रात केलेल्या विविध विकास कामांमुळे मोठ्या प्रमाणावर भाजपाचं बळ वाढले असल्याचा दावा भाजप मंडळ अधिकार्यांनी केला आहे .
* आमच्या मागण्याचा सकारात्मक विचार करावा
तसेच साहेब आमच्यासारखे तमाम कार्यकर्ते या निवडणुकीची 2017 पासून तयारी करत आहेत व 2022 ला देखील निवडणुकांना झाल्या नाहीत व आज जवळपास चार वर्षे उलटून गेले आहेत व या येणाऱ्या निवडणुकीमध्ये देखील आम्हा कार्यकर्त्यांना जर संधी मिळाली नाही तर आमच्या तीन टर्म ह्या वाया जातील तरी आपण या पत्रातील आमच्या भावना समजून घेऊन, त्यावर सकारात्मक विचार करावा अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली आहे .