
* भाजपला ३० तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला २० जागा मिळण्याची शक्यता
* डिसेम्बरच्या पहिल्या आठवड्यात करण्यात आलेल्या सर्व्हेचे आकडेवारी
ठाणे : कोणतेही सर्वेक्षण हे ब्रह्मवाक्य नसते. ते जेव्हा केले जाते तेव्हाचा अंदाज व्यक्त करते. अस्से स्पष्ट करत प्रा दयानंद नेने यांच्या एम्पिरिकल सर्वेक्षण सतर्क नागरिक फौंडेशन या संस्थेने डिसेंबर २०२५ च्या पहिल्या आठवड्यात एक सर्वेक्षण केले आहे . या सर्वेक्षणात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ७० जागा मिळतील असे स्पष्ट करण्यात आले असून भाजपला ३० तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला २० जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यात राष्ट्रवादी अजित पवार गट ४ ,शिवसेना उद्धव ठाकरे गटाला फक्त २ तर इतरांना ५ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे .
सर्वेक्षण करताना ठाण्यात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार एकत्र पण भाजपा वेगळी लढेल असे गृहीत धरले होते. समोर महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र लढतील असे गृहीत धरले होते.• आमचं या आधीचे सर्वेक्षण सप्टेंबर मध्ये केले होते. दोन्ही सर्वेक्षणात निष्कर्ष्यामध्ये ठाणे भागात विशेष फरक पडलेला नाही – फक्त कळवा मुंब्रा ची परिस्थिती अधिक स्पष्ट झाली आहे.
• ही परिस्थिती 10 डिसेंबर रोजीची आहे. या नंतर पक्षांतरे, फाटाफुटी, बंडखोऱ्या झाल्या तर परिस्थिती थोडी बदलेल असे सांगताना मनसेला एकही जागा मिळणार नाही तसेच शहरात काँग्रेसची पाटी कोरी राहील असे प्रा दयानंद नेने यांनी महाराष्ट्र tolk बरोबर बोलताना सांगितले .
सर्व्हे चे विश्लेषण:
• ठाणे महानगरपालिका (TMC) 2025 च्या पार्श्वभूमीवर केलेल्या सर्वेक्षणातून अतिशय स्पष्ट आणि ठळक राजकीय संकेत दिसून येतात.
• तीन प्रमुख पक्ष निवडणुकीनंतर ठाण्यात उभे राहतील : *शिवसेना (शिंदे)*, *भाजपा*, आणि *राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)*.
• ठाणे शहरांत वार्डांमध्ये *SS व BJP* मध्ये थेट सामना आणि जा्गांचे विभाजन , तर कळवा मुंब्र्यात *NCPSP चे मजबुत पुनरागमन* दिसते.
*१) शिवसेना शिंदे गट गट — ठाण्यातील सर्वात मोठा पक्ष – ७० जागा
सर्वेक्षणानुसार शिवसेना शिंदे गट ७० जागांसह सर्वात मोठा पक्ष — म्हणजेच *TMC मधील अव्वल शक्ती* राहण्याची शक्यता प्रबळ आहे.
* गावे, कोळीवाडे, पारंपरिक सेनाभिमानी विभागात अजूनही पकड मजबूत.
* विकासकामे व संपर्कात राहणारा पक्ष म्हणून प्रतिमा टिकवण्यात यश.
* मध्यम व निम्न मध्यम वर्ग, कामगार वर्ग – अजून सेनेला सपोर्ट
*२) भाजपा — आपली ‘कोर ताकद’ टिकवते, पण विस्तार मर्यादित- ३० जागा
हे भाजपा साठी वाईट नाही, परंतु वाढही नाही.
*भाजपचे बलस्थान*
* मनपाची ‘उत्तरेकडील पट्टी’ — वसंत विहार, मानपाडा, ब्रह्मांड, हिरानंदानी इस्टेट, घोडबंदर भागात मजबूत संघटन.
*नौपाडा नेहमीप्रमाणे मजबूत. खारटन – कोळीवाड्यात आश्चर्यकारक प्रगती
* प्रबळ हिंदुत्ववादी आणि मध्यमवर्गीय मतदारांचा ठोस पाठिंबा.
* गुजराती, मारवाडी, उत्तर भारतीय भाजपा पाठी.
*३) राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) — कळवा मुंब्र्यात अजून जितेंद्र आव्हाड यांचाच आवाज – २० जागा
NCPSP हा पक्ष पुन्हा या निवडणुकीतील जोरात कम बॅक करू शकतो.
*का?*
* मुंब्रा, कळवा, ज्या मुस्लिम बहुल भागात पहिले राष्ट्रवादीचे वर्चस्व होते, ते परत मिळवण्याची चिन्हे.
* जितेंद्र आव्हाड यांच्या प्रभावामुळे काही वार्ड NCPSP च्या बाजूने झुकतात.
* स्थानिक पातळीवरील ठोस रणनीती.
२० जागांसह हा गट विरोधी पक्षांचा आवाज ठरू शकतो.
*४) NCP (अजित पवार गट) — मर्यादित प्रभाव – अवघ्या ४ जागा
* राबोडी – वॉर्ड क्र 10 मध्ये ताकद
* मुंब्र्यात NCPSP ला जोरदार टक्कर पण सीट जिंकण्याची शक्यता कमी
*५) शिवसेना (उद्धव ठाकरे गट) — प्रभाव सीमित – अवघ्या २ जागा
* वार्ड 11 आणि 12 मध्ये 1-1 जागा ही अत्यंत कमी संख्या.
* एकेकाळी SSUBT चा दणदणाट असलेल्या ठिकाणी आता कार्यकर्त्यांत दृश्य घट.
* विभाजनानंतरचे नेतृत्वही ‘ठाणे’ मध्ये फारच कमजोर.
*६) इतर — 5 जागा (काही ठिकाणी NCPAP जिंकू शकते)*
* काही ठिकाणी स्थानिक प्रबळ उमेदवारांची पकड.
* पारंपरिक मोठ्या पक्षांविषयी असलेल्या नाराजीतून निर्माण झालेले स्पेस.
पार्ट *ब*
*वॉर्ड निहाय अंदाज ![]()
* क्रमांक 1:* 2 शिवसेना / 2 भाजप
* क्रमांक 2:* 4 भाजप
* क्रमांक 3:* 2 शिवसेना / 2 भाजप
* क्रमांक 4:* 4 भाजप
* क्रमांक 5:* 4 शिवसेना
* क्रमांक 6:* 4 शिवसेना
* क्रमांक 7:* 4 शिवसेना
* क्रमांक 8:* 4 शिवसेना
* क्रमांक 9:* 4 शिवसेना
* क्रमांक 10:* 4 रा.काँ. (अजित पवार गट)
* क्रमांक 11:* 3 भाजप / 1 शिवसेना (उद्धव ठाकरे गट)
* क्रमांक 12:* 3 भाजप / 1 शिवसेना (उद्धव ठाकरे गट)
* क्रमांक 13:* 4 शिवसेना
* क्रमांक 14:* 4 शिवसेना
* क्रमांक 15:* 2 भाजप / 2 शिवसेना
* क्रमांक 16:* 4 शिवसेना
* क्रमांक 17:* 4 शिवसेना
* क्रमांक 18:* 4 शिवसेना
* क्रमांक 19:* 4 शिवसेना
* क्रमांक 20:* 2 भाजप / 2 शिवसेना
* क्रमांक 21:* 4 भाजप
* क्रमांक 22:* 4 भाजप
* क्रमांक 23:* 2 राष्ट्रवादी (शरद पवार गट) / 2 शिवसेना
* क्रमांक 24:* 2 राष्ट्रवादी (शरद पवार गट) / 2 शिवसेना
* क्रमांक 25:* 3 राष्ट्रवादी (शरद पवार गट) / 1 इतर
* क्रमांक 26:* 2 राष्ट्रवादी (शरद पवार गट) / 2 इतर
* क्रमांक 27:* 4 शिवसेना
* क्रमांक 28:* 4 शिवसेना
* क्रमांक 29:* 4 शिवसेना
* क्रमांक 30:* 4 राष्ट्रवादी (शरद पवार गट)
* क्रमांक 31:* 2 शिवसेना / 2 इतर
* क्रमांक 32:* 3 राष्ट्रवादी (शरद पवार गट) / 1 इतर
* क्रमांक 33:* 4 राष्ट्रवादी (शरद पवार गट)
*एकूण:131*
*एकूण जागांचा अंदाज*
*शिवसेना (शिंदे गट)** ७०
*भाजपा* ३०
*राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट* २०
*राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट* ०४
*शिवसेना (उद्धव ठाकरे गट)* ०२
*इतर* ०५