
वंचित बहुजन आघाडीचा डोंबिवलीत दणका
डोंबिवली : महाविद्यालयात काम करणाऱ्या मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना वेळोवेळी जातिवाचक अपशब्द वापरणे, अपमानित करणे , महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अपशब्द वापरणे हे डोंबिवलीच्या मढवी महाविद्यालयाच्या संचालक त्यांचा मुलगा आणि प्राचार्य यांना चांगलेच महागात पडले आहे . वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यानी डोंबिवलि रामनगर पोलिस ठाण्यात ठिय्या मांडल्याने पोलिसाना अखेर मढवी महाविद्यालयावर ” ॲट्रॉसिटी ” गुन्हा दाखल करावा लागला आहे . पोलिसानी गुन्हा दाखल केला असला तरी यात कायद्याची योग्य कलमे लावण्यात आली नसल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे .
मढवी महाविद्यालयात काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांची गेल्या काही वर्षापासून पिळवणूक सुरू होती त्यांना सतत जातिवाचक शब्द वापरुन अपमानित करण्यात येत होते एक महिला कर्मचारीला कामावरून काढू टाकण्यात आले तसेच तिचा वेळोवेळी अपशब्द वापरुन अपमान करण्यात आला या प्रकरणाची माहिती वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी
डोंबिवली पश्चिम शहराध्यक्ष गणेश गायकवाड वंचित महिला आघाडी मा. महासचिव आदरणीय रेखाताई कुरवारे तसेच डोंबिवली पश्चिम महासचिव सुषमा निर्भवणे तसेच दीपक भाऊ भालेराव तसेच वंचित चे डोंबिवली पूर्वचे उपाध्यक्ष केदारे तसेच पीडित महिला व त्यांचे सहकारी दत्ता जाधव या सर्वानी शुक्रवारी डोंबिवलीच्या रामनगर पोलिस ठाण्यात धडक दिली . यावेळी ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करून संबंधित पिढीताना पोलीस संरक्षण मिळावे . तसेच ॲट्रॉसिटी ॲक्ट मधे पुरवणी जबाबानुसार अजून जास्तीत जास्त कलम त्यामध्ये मेन्शन करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली .
* वंचित बहुजन आघाडीचा आरोप
वंचित बहुजन आघाडी डोंबिवली पश्चिम शहर कमिटी तर्फे अखेर मढवी कॉलेज येथील बौद्ध कर्मचाऱ्यांना व ओबीसी कर्मचाऱ्यांना तेथील जातीवादी मढवी कॉलेजचे मालक व त्यांचे चिरंजीव व तेथील मुख्याध्यापक यांच्याकडून होणाऱ्या जातीय द्वेष व नीच मानसिकतेच्या वृत्तीकहा निषेध करण्यात येत आहे . या लोकांमध्ये मागासवर्गीयांना जाती वरून हिनवण्याची प्रथा रक्तात भिनलेली असून व अमाप पैशाचा माज आहे . जातीवादी व मनुवादी वृत्तीच्या बांडगुळांना अखेर कायद्याचा दणका देऊन संबंधितांवर ॲट्रॉसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे . त्यांना कायदा काय असतो कायद्याचा धाक काय असतो याची जाणीव करून दिली. तसेच महामानवान बद्दल कोणत्याही प्रकारचे आदर सन्मान नसणाऱ्या चुकीच्या पद्धतीने बहुजन समाजातील व मागासवर्गीय समाजातील लोकांना पैशाच्या जोरावर व सत्तेच्या जोरावर आपण काहीही बोलू शकतो त्यांचा अपमान करू शकतो त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देऊ शकतो तसेच महामानवान बद्दल अपशब्द वापरून त्यांना अपमानित करण्याचा प्रयत्न करणाऱ्याना तसेच त्यांना कायद्याचे कोणतेही गांभीर्य नसून आमचं कोणी काही करू शकत नाही अशा विचारसरणीचा व त्यांच्या ब्राह्मणी वृत्तीच्या लोकांचा आज कायदा काय व कायद्याने काय होऊ शकते आणि या भारत देशात या लोकशाहीमध्ये सामान्य ते अतिसामान्य नागरिकाला कायद्याचे संरक्षण कवच व कायदा पुढे कोणी मोठे नाही हे आज संबंधित मनुवादी व जातीवाद्यांना दाखवून देण्याचे काम आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दाखवून देण्यात आले अशी माहिती डोंबिवली पश्चिम महासचिव सुषमा निर्भवणे यांनी दिली .