
* महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एकमेकांचे मोहरे गळाला लावण्याची स्पर्धा ठाणे : शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांना भाजपने आपल्या गळाला लावत एकनाथ शिंदे यांना शह दिलेला असताना अवघा काही तासात शिवसेना शिंदे गटाने भाजपचे माजी नगरसेवक विकास गजानन म्हात्रे, भाजपच्या माजी नगरसेविका कविता विकास म्हात्रे आणि माजी नगरसेवक नंदू धुळे – मालवणकर यांना आपल्याकडे खेचले आहे . त्यामुळे जिल्ह्यात मोठा भाऊ होण्यासाठी या दोन मित्र पक्षातच जोरदार रस्सीखेच सुरु असल्याचे दिसत असून येत्या काही काळात ही स्पर्धा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे . ठाणे जिल्हा हा पूर्वीचा जनसंघ आणि नंतरचा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता . परंतू शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनीया जिल्ह्यात चांगले संगठन बांधले आणि भाजप कडून ठाणे लोकसभेची हक्काची शिवसेनेकडे खेचुन घेतली. . दरम्यान २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पाडत भाजपणे पुन्हा सत्तेचा डाव मांडला , यात एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची लॉटरी लागली मात्र त्यांनी आपल्या मंत्रिमंडळात गणेश नाईक यांना संधी दिली नाही , २०२४च्या लोकसभा निवडणुकीत संजीव नाईक यांना भाजपकडून ठाणे लोकसभेचे तिकीट मिळणार असे संकेत देण्यात आले होते त्यांनी प्रचारही सुरु केला होता मात्र शेवटच्या क्षणी त्यांचे तिकीट कापून शिंदे सेनेच्या नरेश म्हस्के यांना संधी देण्यात आली आणि ते विजयीही झाले . आधीच दुरावा असलेल्या नाईक आणि शिंदे यांच्यात लोकसभा निवडणुकीपासून उभा संघर्ष पेटला असताना आता जिल्हात बळ वाढवण्याची जबाबदारी भाजपने नाईक यांच्यावरच टाकली आहे .
गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात १८ पैकी ९ जागा जिंकत भाजपने मोठे यश मिळवले आहे.तर शिवसेना शिंदे गटाला एका जागेचा फायदा झाला आहे. जिल्ह्यात आमदारांची संख्या वाढली असल्याने ठाणे जिल्ह्यात भाजपहा शिवसेना शिंदे गटापेक्षा वरचढ झाला आहे. आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधिक ७,राष्ट्रवादीने ४,शिवसेनेने ६ तर कल्याण पूर्वेतून अपक्ष आमदार गणपत गायकवाड विजयी झाले होते, गायकवाड हे २०१९ ला भाजपच्या तिकीटावर लढले होते त्यावेळी भाजपला सर्वाधिक
८ तर एकत्रित शिवसेनेने ५ जागा जिकल्या होत्या मात्र यंदा भाजपला एका आणि शिवसेना शिंदे गटाला एका जागेचा फायदा झाला आहे .* आगामी निवडणुकीत भाई विरुद्ध दादा सामना रंगणार जिल्ह्यावर सध्या एकनाथ शिंदे यांचे एकहाती वर्चस्व आहे एकनाथ शिंदे यांच्यात आणि गणेश नाईक यांच्यात फारसे सख्य नाही हे वेळोवेळी उघड झाले आहे . एकत्रित राष्ट्र्वादीत असताना महापौर , आमदार , खासदार . पालकमंत्री अशी सत्तेची सर्व महत्वाची पदे नाईक कुटुंबाकडे होती मात्र गेल्या काही वर्षांपासून फक्त आमदारकी गणेश नाईक यांच्याकडे होती आता त्यांना भाजपणे कॅबिनेट मंत्री केले असल्याने जिल्ह्यात बळ वाढवण्याची जबाबदारी त्यांच्यावर भाजपने टाकली असल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाण्यात भाई विरूद्ध दादा असा सामना रंगणार हे उघड आहे .