
*
दिवा संघर्ष समितीचे अध्यक्ष राजकांत पाटील यांची मागणी
ठाणे : ” दिवा’ आणि समस्यांची बजबजपुरी हे दोन्ही शब्द एकमेकांसाठी दिव्यातील परिस्थितीबाबत समानार्थी म्हणून वापरले जातात. अनधिकृत बांधकामांचे माहेरघर, समस्यांचा डोंगर आदी विशेषणे दिव्याबाबत कायम वापरण्यात येतात. येथील पायाभूत विकास कधी होणार, अशी चिंता दिव्याच्या रहिवाशांना भेडसावत आहे. रोगराई ही येथील मुख्य समस्या असून डम्पिंग ग्राऊंड, दुषित पाणी, ही त्याची मूळ कारणे आहेत. या परिस्थितीत बदल व्हावा, अशी मागणी दिवा संघर्ष समितीचे अध्यक्ष राजकांत पाटील यांनी केली आहे.
दिवा परिसरात वाढत्या फेरीवाल्यांमुळे स्थानिक नागरिकांना होणाऱ्या त्रासाचा प्रश्न गंभीर झाला आहे. सार्वजनिक वाहतूक, पादचारी मार्ग आणि रस्त्यावरील अडथळे यामुळे नागरी जीवन विस्कळीत झाले आहे.दिवा हा आरोग्य बाबतीत फार गंभीर होत आहेत. कल्याण डोंबिवली येथे मोफत ड्रेनेजची सोय आहे. येथे पैसे फी देऊन ही सोय निट होत नाही. फलेरिया विभागात डास, मुंग्या, किटाणू, उंदिर ह्या गंभीर समस्याकडे लक्ष देणे गरजेचे असून पालिका दवाखाना उभारणे गरज निर्माण झाली आहे. कळवा, डोंबिवली, मुंबई जावे लागते. कधी आठवत नाही की, स्वच्छता मोहिमपालिकेने केली असावी. ठिकठिकाणी कचरा, दुर्गंध, ड्रेनिज भविष्यात मोठी गंभीर समस्या निर्माण होणार ह्यात शंका नाही. येत्या काही दिवसात पालिका भवनातून योग्य ती साहित्याची मागणी करुन या गंभीर प्रश्नाचा विचार करावा.
साथीचे आजार आणि रोगराई पसरण्याचे आणखी एक मूलभूत कारण म्हणजे येथील मलनिःसारण व्यवस्था. त्यामुळे या प्रभागातील नागरिक मेटाकुटीला आले आहेत. बेसुमार वाढलेल्या लोकसंख्येच्या मलनिःसारणाची सोयच संपूर्ण दिवा भागात नाही. त्यामुळे इमारती, चाळी तसेच रस्त्याच्या आजूबाजूने असणाऱ्या गटारांमध्येच विनाप्रक्रिया दुर्गंधीयुक्त पाणी सोडले जाते. सभोवताली पसरणाऱ्या सांडपाण्यामुळे माशा, डासांची पैदास वारेमाप वाढली आहे. त्यामुळेच रोगराई, आजारपणांनी येथील नागरिक हतबल आहेत. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांचे आजारी पडण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. याचा पालिका प्रशासनाने गांभीर्याने विचार करून तातडीने पावले उचलावीत अशी मागणी राजकांत पाटील यांनी पालिकेच्या दिवा प्रभाग उपायुक्त यांच्याकडे केली आहे .