December 24, 2025
महाराष्ट्र Talk

मनोरंजन

रश्मिका मंदाना स्टारर ‘मायसा’ चित्रपटाच्या टीममध्ये प्रसिद्ध म्युझिक डायरेक्टर जेक्स बिजॉय यांचा सहभाग!

 Thane Radio  October 17, 2025 

संपूर्ण वर्षभर प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या थ्रिलिंग अ‍ॅक्शन सिनेमांनंतर, आता तयार व्हा ‘मायसा’साठी. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच तो चर्चेचा विषय ठरला आहे. ‘मायसा’ हा चित्रपट आदिवासी भागातील निसर्गरम्य स्थळांवर शूट करण्यात आला असून, रश्मिका मंदाना प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी वेळोवेळी अपडेट्स शेअर करत प्रेक्षकांची उत्सुकता जपली आहे.

आता त्यांनी आणखी एक महत्त्वाची माहिती दिली आहे – प्रसिद्ध म्युझिक डायरेक्टर आणि प्लेबॅक सिंगर जेक्स बिजॉय आता ‘मायसा’चा भाग बनले आहेत आणि त्यांच्या संगीत कौशल्याने या चित्रपटाच्या कथेला अधिक प्रभावी बनवणार आहेत.

संगीत विश्वातील एक प्रसिद्ध नाव असलेले जेक्स बिजॉय आता ‘मायसा’साठी खास संगीत तयार करणार आहेत. ते अनेक कलाकारांबरोबर, विशेषतः स्थानिक कलाकारांसोबत काम करत, असं संगीत सादर करतील जे आदिवासी संस्कृतीशी जोडलेले असेल आणि प्रेक्षकांच्या मनाला भावेल. चित्रपटाची संगीत टीम आणि त्यांचं संगीत प्रेक्षकांच्या भावना आणि चित्रपटाच्या तीव्रतेला अधिक गहिरं करेल, असं दिसत आहे.

जेक्स बिजॉय याआधी दुलकर सलमानच्या ‘लोकाहा’ आणि मोहनलालच्या ‘थुडाराम’सारख्या हिट चित्रपटांसाठी संगीत देऊन यश मिळवले आहे. त्यामुळे त्यांच्या संगीतामुळे ‘मायसा’ची कथा आणि भावना अधिक प्रभावी होतील, अशी प्रेक्षकांना अपेक्षा आहे.

https://www.instagram.com/reel/DP1BDmlE5aR/?igsh=ZXd0bThyZnhieG1h

अलीकडेच ‘मायसा’च्या निर्मात्यांनी चित्रपटाचा पोस्टर रिलीज केला, ज्यामध्ये रश्मिका मंदानाचा जबरदस्त लूक दिसून आला. रक्ताने माखलेला चेहरा, विस्कटलेले केस आणि हातात घट्ट पकडलेली तलवार – रश्मिकाचा हा तीव्र लूक पाहून लगेचच प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरु झाली आहे.

फक्त पोस्टरच पुरेसं आहे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करण्यासाठी, कारण ते या थरारक कथानकाची झलक दाखवतं.

‘अनफॉर्म्युला फिल्म्स’च्या निर्मितीखाली आणि रवींद्र पुल्ले यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणारा ‘मायसा’ हा चित्रपट आदिवासी पार्श्वभूमीवर आधारित एक भावनात्मक अ‍ॅक्शन थ्रिलर आहे. या चित्रपटात असलेली वेगळी पार्श्वभूमी, भव्य व्हिज्युअल्स आणि रश्मिकाची दमदार परफॉर्मन्स – या सगळ्यामुळे ‘मायसा’ प्रेक्षकांना एक थरारक सिनेमा अनुभव देणार आहे, जो त्यांच्या मनात आणि आठवणींमध्ये दीर्घकाळ राहील.

https://maharashtratalk.com/