
ठाणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त ठाणे पूर्व हरीओम नगर येथे नालंदा शाळेसमोरील मैदानात शनिवार दिनांक सोळा मे रोजी सायंकाळी झालेल्या हिंदू संमेलनात हरीओम नगर परिसरातील हिंदू बंधू-भगिनींच्या उपस्थितीत नवचैतन्याचा शंखनाद झाला.
संमेलनाचे मुख्य वक्ते, ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि ख्यातनाम राजकीय विश्लेषक मकरंद मुळे यांनी आपल्या भाषणात हिंदू समाजासमोरील छुप्या आव्हानांचा बुरखा फाडला. जेव्हा जेव्हा या भूमीवरील हिंदू समाज घटला, तेव्हा तेव्हा भारताचा भूगोल बदलला!” असे उदाहरणासह मकरंद मुळे यांनी स्पष्ट केले. प्रमुख वक्ते मकरंद मुळे यांनी आपल्या भाषणात हिंदू समाज बांधवांना जातीभेद गाडून ‘हिंदू, हिंदुत्व आणि हिंदूपण’ ही त्रिसूत्री जीवनात आणण्याचे आवाहन केले.
या हिंदू संमेलनात विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम स्थानिक नागरिकांनी सादर केले. सायबर सुरक्षा तज्ज्ञ धनंजय देशपांडे यांचेही यावेळी भाषण झाले.प्रमुख वक्ते मकरंद मुळेआपल्या भाषणात म्हणाले, इतिहासापासून धडा घेऊन अखंड भारत ते आजचा खंडित भारत समजून घेतला पाहिजे.
आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात प्राचीन संदर्भांचा दाखला देत मकरंद मुळे यांनी स्पष्ट केले की, आपल्या भूमीला वंदनीय मानले जाते. आपला ‘अखंड भारत’ आज खंडित झाला आहे. गंधार आजचा ‘अफगाणिस्तान’ झाला. सिंध प्रांत पाकिस्तानात गेला आणि पूर्व बंगालचा बांगलादेश झाला. हे भौगोलिक आकुंचन केवळ राजकीय नव्हते; तो लोकसंख्येच्या आधारे झालेला पराभव होता. जिथे जिथे हिंदू अल्पसंख्याक झाला, तो भूभाग भारतापासून कायमचा तुटला, हा इतिहास विसरून चालणार नाही, असे मकरंद मुळे यांनी सांगितले.
हायब्रीड वॉरफेअर जिहादचे आधुनिक प्रकार यावर बोलताना मकरंद मुळे म्हणाले,
आज हिंदू समाजासमोर पारंपरिक समोरासमोरचे युद्ध नाही, तर एक अदृश्य आणि अत्यंत छुप्या पद्धतीचे युद्ध (Asymmetric Warfare) सुरू आहे. लव्ह जिहाद, खोटी नावे आणि धार्मिक ओळख लपवून हिंदू मुलींना जाळ्यात ओढले जात आहे. लॅण्ड जिहाद, जमिनींवर ताबा महाराष्ट्रातील विशाळगड, प्रतापगड या ऐतिहासिक आणि पवित्र किल्ल्यांवर झालेली अनधिकृत अतिक्रमणे आणि वक्फ कायद्याचा आधार घेत हिंदूंच्या जमिनींवर ठोकले जाणारे दावे हा लॅण्ड जिहादचा थेट पुरावा आहे. स्टडी जिहाद, वैचारिक प्रदूषण काही शैक्षणिक संस्था आणि विशिष्ट विचारसरणीच्या माध्यमातून हिंदू सण, परंपरा आणि इतिहासाला पद्धतशीरपणे हीन दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. दिवाळी आली की प्रदूषण आणि होळी आली की पाण्याचा अपव्यय, असा खोटा प्रचार करून तरुण पिढीच्या मनात आपल्याच संस्कृतीबद्दल न्यूनगंड निर्माण केला जात आहे. फूड जिहाद, समांतर व्यवस्था विशिष्ट धार्मिक प्रमाणपत्राच्या नावाखाली अन्नपदार्थांपासून ते गृहोपयोगी वस्तू आणि गृहनिर्माण प्रकल्पांपर्यंत एक प्रचंड मोठी समांतर व्यवस्था उभी केली जात आहे. कॉर्पोरेट जिहाद, व्यवसायिक उदयोग विकृतीकरण जाहिरात क्षेत्र आणि मोठ्या कॉर्पोरेट ब्रँड्सकडून हिंदू सणांचे व्यापारीकरण आणि विकृतीकरण केले जात आहे. हिंदू सणांना, मंगल विधींना जाहिरातींमधून चुकीच्या पद्धतीने दाखवणे, हा याचाच भाग आहे.
आव्हान समजून घेऊन त्याला संघटितपणे सामोरे जाणे ही काळाची गरज आहे असे सांगून मकरंद मुळे पुढे म्हणाले, यापार्श्वभूमीवर पंच परिवर्तन समजून घेऊन कृती करणे सोईचे ठरेल. सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संवर्धन, स्वदेशी, नागरी कर्तव्य यातून बदल घडू शकेल.मकरंद मुळे यांनी आपल्या भाषणात शेवटी म्हणाले, हिंदू पुनरुत्थानाची मोठी संधी आहे.हिंदू ही आपली ओळख आहे, हिंदुत्व हा आपला शाश्वत विचार आहे. ‘हिंदूपण’ हे आपले कृतीशील रूप आहे.
संमेलनाला महिलांची उपस्थिती विशेष होती. सूत्र संचालन मनिषा ओक आणि संगीता जोशी यांनी केले. हरीओम नगर आणि परिसरातील मधु गुट्टी,
प्रज्ञेश साठे, प्रवीण जोशी, शशांक पारकर, संतोष सावंत, रणजित हर्डीकर, अदिती जांबोटकर यांनी संमेलन आयोजनासाठी पुढाकार घेतला होता. संमेलनाचा समारोप वंदे मातरमने झाला.ठाणे महानगरपालिका परिसरात नव्वद हिंदू संमेलन दिनांक पंधरा जून पर्यंत होणार आहेत. त्यापैकी अठ्ठावीस संमेलन यशस्वीपणे झाली आहेत.