
ठाणे : वाल्मिकी समाजाचे वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार बिरमसिंह कीर यांचे पंच्याहत्तरव्या वाढदिवसाच्या निमित्ताने (अमृत महोत्सवी जन्मदिवशी) मंगळवारी १० फेब्रुवारी रोजी ठाणे येथील वाल्मिकी समाज सभागृहात जाहीर सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ते व म्युनिसिपल लेबर युनियनचे सरचिटणीस, समता विचार प्रसारक संस्थेचे माजी विश्वस्त बिरपाल भाल यांच्या जन्मदिनानिमीत्त आणि नुकतेच एल एल बी ची पदवी मिळवणारे अजय राठोड यांचा जाहीर सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
बहुजन विकास संघाचे वतीने आयोजित या कार्यक्रमात ठाणे व मुंबईतील विविध संस्था संघटनांचे प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.बिरमसिंह कीर यांनी बाल्मिकी परिवर्तन आणि कीर टाईम्स च्या माध्यमातून समाजाच्या विविध प्रश्नांना वाचा फोडली आहे. त्यांनी लिहिलेल्या अनेक कवितांच्या पुस्तिका देखील प्रकाशित केलेल्या आहेत.
या प्रसंगी व्यासपीठावर सत्कार मूर्तींसह वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ते व कामगार नेते जगदीश खैरालिया, सामाजिक कार्यकर्ते राजा बाल्मिकी होते.
बहुजन विकास संघाचे नरेश भगवाने, नरेश बोहित, रिना चिंडालिया, राम वाल्मीकि, राजेश चिंडालिया,मनिष जीनवाल, जयप्रकाश डागोरी, सतीश वाल्मीकि, अनिल गढीवाल,अजित चौहान,सागर जीनवाल,सतपाल मेहरोल,मनिष पाथरिया, सुरेन्द्र लोट,अनिल पारचा, विनोद जीनवाल,हरिश राजोरिया आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.