
कल्याण : दावडी गावातील उद्योजक तथा कल्याण -डोंबिवली महापालिकेचे नगरसेवक जालिंदर पाटील याचे थोरले बंधू सोमनाथ उर्फ स्वामी पाटील यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी निधन झाले आहे.
रविवारी सोमनाथ उर्फ स्वामी पाटील हे ४०+ वयोगटातील क्रिकेट सामने खेळण्यासाठी खोणी येथिल क्रिकेट टूर्नामेंट मध्ये सहभागी झाले होते. क्रिकेट खेळून घरी जाण्यासाठी आपली कार चालू करत असताना अचानक त्यांच्या छातीत कळ येऊन ते जागीच मूर्च्छित झाले. लागलीच त्यांना जवळच असणाऱ्या खोणी येथील रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आहे. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृत्यू समयी त्यांचे वय ५२ वर्षे होते.
सोमनाथ उर्फ स्वामी पाटील हे अत्यंत शांत आणि सरळ स्वभावाचे प्रेमळ व्यक्तिमत्व होते . रविवारी उशिरा दावडी येथिल समशानभूमीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारोच्या संख्येने ग्रामस्थ , मित्रपरिवार, नागरिक उपस्थित होते. त्यांच्या अकाली जाण्याने पाटील कटुंबीय व ग्रामस्थांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सोमनाथ पाटील यांच्या पश्चात पत्नी ,एक मुलगा, दोन मुली, सहा भाऊ , बहीण असा मोठा परिवार आहे.