
शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार माजी नगरसेवक मिलिंद पाटील अडचणीत
कावेरीताई पाटील यांची नातसून सपना पाटील यांचे गंभीर आरोप
ठाणे : ठाणे महापालिका निवडणूक अवघ्या काही तासांवर येवून ठेपलेली असताना कळवा परिसरातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार सपना समीर पाटील यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आणि त्यांचेच दीर मिलिंद पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत . त्यांनी आपले अपहरण केले होते असा आरोप केला असल्याने कळवा परिसरात खळबळ माजली आहे .
सोशल मिडीयावर दिलेल्या मुलाखतीत सपना समीर पाटील यांनी माजी नगरसेवक आणि कळव्यातील शिंदे गटाचे उमेदवार मिलिंद पाटील यांच्यावर खूप गंभीर आरोप केले आहेत. मिलिंद यांनी माझे पती समीर पाटील यांना सुरवातीपासून खूप त्रास दिला आहे . आमचा साखरपुडा झाला तेव्हापासून हा त्रास सुरु आहे . लग्न होते ३० जूनला त्यापूर्वी ११ जून पासून मला त्रास देणे सुरु केले . त्यावेळी माझे अपहरण करण्यात आले
घरी घेवून गेले लग्न करू नको असे धमकावण्यात आले . समीर बरोबर लग्न करू नको असे धमकावण्यात आले . रात्री साडेअकराची वेळ असताना असे धमकावणे सुरु होते , आमच्या घरी येवूनही धमक्या देण्यात आल्या.माझ्या लग्नातही मला त्रास देण्यात आला . या प्रकरणी मी सर्व राजकीय नेत्यांकडे तक्रारी केल्या आहेत .मिलिंद पाटील यांनी प्रभागात कोणती कामे केली आहेत ? गटार मीटर तर कोणीही करतो , त्यांची लक्षणीय कामे कोणती आहेत , शेजारच्या मुकुंद केणी , प्रमिला केणी यांच्या प्रभागातील कामे बघा , कोरोना काळात मुकुंद केणी लोकांच्या सेवेत फिरत होते , त्यांनी किती लक्षणीय कामे केली आहेत , गार्डन उभारली आहेत , समाज मंदिर उभारले आहे त्यांनी अशी लोकोपयोगी कामे केलेली असताना तुम्ही मात्र आरक्षित भूखंड स्वताच्या फायद्यासाठी बळकावले असल्याचे गंभीर आरोप शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार माजी नगरसेवक मिलिंद पाटील यांच्यावर केले आहेत.