
सामाजिक कार्यकर्ते अजय जेया यांची मागणी
ठाणे ; सामाजिक कार्यकर्ते अजय जेया यांनी ठाणे येथील स्लम रिहॅबिलिटेशन ऑथॉरिटी (SRA) तसेच निवडणूक आयोगाला निवेदन देऊन ठाणे महापालिका निवडणुकीत उमेदवारी दाखल करणाऱ्या कोणत्याही डेव्हलपरकडून “नो ड्यू सर्टिफिकेट” अनिवार्य करण्याची मागणी केली आहे.
आपल्या पत्रात अजय जेया यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे की,जे डेव्हलपर SRA योजनेनुसार झोपडपट्टीवासीयांना देय असलेले भाडे ( ट्रांझिट रेंट ) भरत नाहीत,अशा डेव्हलपरांना निवडणूक लढविण्याची परवानगी देण्यात येऊ नये. SRA कायद्यानुसार वेळेवर भाडे भरणे ही त्यांची कायदेशीर व नैतिक जबाबदारी असताना अशा नियमभंग करणाऱ्या डेव्हलपरांना निवडणुका लढण्याची मुभा देणे ही झोपडपट्टीवासीयांवरील अन्यायकारक व प्रशासनिकदृष्ट्या चुकीची बाब असल्याचे अजय जेया यांनी लक्ष वेधले SRA योजने अंतर्गत राहणाऱ्यांनी शासनाच्या सूचनेनुसार घरे रिकामी केली असून प्रकल्पावरील विश्वास दाखवला,परंतु अनेक विकासकांनी झोपडपट्टी वासीयांचे वेळेवर भाडे न दिल्याने कुटुंबांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.SRA कडून नोटिसा देऊनही भाडे न भरण्याची परिस्थिती कायम असून, झोपडपट्टीवासीयांनी नियमांचे पालन करून घर रिकामे केले असताना प्रकल्पाचा फायदा घेत असलेले बिल्डर मात्र आपली मूलभूत जबाबदारी टाळत आहेत,असेही जेया यांनी म्हटले
ते पुढे म्हणाले की ठाणे महापालिका स्वतःच्या सर्व विभागांकडून—जसे की पाणी कर,मालमत्ता कर,कचरा कर, तसेच प्रलंबित वाहन दंड—यांचे “नो ड्यू सर्टिफिकेट” घेतल्याशिवाय कोणत्याही उमेदवाराला निवडणूक लढू देत नाही. मग SRA अंतर्गत विकास कामे करणाऱ्या व मोठ्या जबाबदाऱ्या असलेल्या डेव्हलपरांना हेच नियम लागू का केले जात नाहीत?एखादा डेव्हलपर झोपडपट्टीवासीयांचे भाडे वेळेत देत नसेल थकबाकी असलेल्या डेव्हलपरांना काळया यादीत टाकण्यात यावे तो जनतेचा प्रतिनिधी होऊ शकत नाही आणि निवडून आल्यानंतर तो आपल्या पदाचा गैरवापर करण्याची शक्यता अधिक असल्याचे जेया यांनी स्पष्ट केले.
ही बाब सार्वजनिक हिताची असल्याचे नमूद करत,अजय जेया यांनी SRA ला विनंती केली आहे की सर्व उमेदवार डेव्हलपरांची झोपडपट्टी वासियांचे थकविलेले भाडे तातडीने वसूल करून कारवाई करावी,SRA नियमांचे उल्लंघन करणाऱ्या डेव्हलपरांची यादी निवडणूक आयोगाला पाठवावी आणि सर्व थकीत देयकांची पूर्णपणे भरपाई झाल्याशिवाय अशा उमेदवारांना निवडणूक लढण्यास प्रतिबंध करावा.
अजय जेया यांनी स्पष्ट केले.SRA ही जनतेच्या कल्याणाची जबाबदारी असलेली सरकारी संस्था आहे,त्यामुळे झोपडपट्टीवासीयांच्या हक्कांचे संरक्षण करून न्याय मिळवून देणे ही SRA ची प्राथमिक जबाबदारी आहे आणि निवडणुकीत त्यांनी केवळ प्रामाणिक व नियमांचे पालन करणाऱ्या उमेदवारांनाच संधी मिळाली पाहिजे.