
ठाणेकर सीए मंगेश पांडुरंग किनारे यांची द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया’ (ICAI) च्या उपाध्यक्षपदी निवड
नवी दिल्ली : द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) या देशातील अग्रगण्य व्यावसायिक संस्थेच्या २०२६–२७ या वर्षासाठी नव्या कार्यकारिणीची घोषणा झाली आहे. ठाणेकर ज्येष्ठ सनदी लेखापाल ( सीए) मंगेश पांडुरंग किनारे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. संस्थेच्या कार्यकारी मंडळाची वार्षिक निवडणूक नवी दिल्ली येथे संस्थेच्या कार्यालयात गुरुवार दिनांक बारा फेब्रुवारी रोजी झाली.
१९९१ पासून सनदी लेखापाल ( चार्टर्ड अकाउंटन्ट ) म्हणून व्यावसायिक सुरुवात करणाऱ्या सीए मंगेश किनरे यांनी २००६ साली वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल (WIRC) येथून संस्थेच्या कामास सुरुवात केली होती. सातत्य, परिश्रम, दूरदृष्टी आणि संघटन कौशल्याच्या आधारे २०१३ मध्ये वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल (WIRC) चे अध्यक्ष म्हणून प्रभावी कामकाज केले होते. केंद्रीय परिषदेत (Central Council) सलग सहा वर्ष काम केले आहे. राष्ट्रीयस्तरावर महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार मंगेश किनारे यांनी पार पाडल्या. सीए मंगेश किनारे यांनी The Institute of Chartered Accountants of India (ICAI) मधील विविध समित्या, धोरणात्मक उपक्रम आणि सदस्य क्षमतावृद्धी कार्यक्रमांमध्ये सक्रिय व प्रभावी भूमिका बजावली आहे. व्यावसायिक प्रामाणिकता, पारदर्शकता आणि सदस्यहित यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांनी अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत. सीए मंगेश किनारे यांच्या वैशिष्ट्यपूर्ण योगदानाची दखल घेऊन ICAI च्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्ष म्हणून सीए मंगेश किनरे यांच्यावर ICAI च्या धोरणात्मक दिशादर्शनाची महत्त्वाची जबाबदारी असेल. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर चार्टर्ड अकाउंटन्सी व्यवसाय अधिक सक्षम करणे, सदस्यांसाठी सेवा-सुविधा वृद्धी करणे, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाला चालना देणे तसेच; भावी पिढीतील चार्टर्ड अकाउंटंट्सना सक्षम मार्गदर्शन करणे याला प्रधान्य असेल.
ठाणेकर सीए मंगेश पांडुरंग किनारे यांच्या निवडीमुळे महाराष्ट्राच्या चार्टर्ड अकाउंटन्सी क्षेत्रात अभिमानाची भावना निर्माण झाली असून, त्यांच्या नेतृत्वाखाली ICAI नव्या उंचीवर झेप घेईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.