
* मीनाक्षी शिंदेच्या राजीनाम्याचे नेमके इंगित काय
ठाणे : शिवसेना शिंदे गटाचे शाखाप्रमुख विक्रांत वायचळ यांनी भूषण भोईर यांच्या उमेदवारीला विरोध करत स्थानिक उमेदवार हवा अशी उघड भूमिका घेतल्याने शिदेंसेनेतील वाद उफाळून आला त्यामुळे वायचळ पक्षविरोधी कार्य केल्याचा ठपका ठेवत शिवसेना शिंदे गट पक्षाचे सचिव संजय मोरे यांनी यचळ यांना शाखाप्रमुख पदावरून तडकाफडकी दूर केले . अशा प्रकारे आपल्या कार्यकर्त्यावर अन्याय
झाल्याचे कारण देत शिवसेनेच्या माजी महापौर, महिला आघाडी ठाणे जिल्हा संघटक मीनाक्षी शिंदे यांनी राजीनामा दिला आहे . मात्र हा राजीनामा समर्थक कार्यकर्त्यांसाठी दिला गेलेला नाही तर मीनाक्षी यांच्या मुलीला राजकरणात सक्रिय करावयाचे असून त्यासाठी तिच्यासाठी पालिका निवडणुकीच्या तिकीट हवे आहे , मुलीच्या तिकिटासाठी मीनाक्षी शिंदे हे पक्ष श्रेष्ठीवर दबाव टाकत असून त्यासाठीच त्यांनी राजीनाम्याचे अस्त्र उपसले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे .
ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून शिवसेनेच्या माजी महापौर, महिला आघाडी ठाणे जिल्हा संघटक मीनाक्षी शिंदे यांनी गुरुवारी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिंदे यांनी हे राजीनामा पत्र पाठवले असून सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार करून वैयक्तिक कारणास्तव हा राजीनामा देत असल्याचे त्यांनी या पत्रात नमूद केले आहे .
ठाण्यात प्रभाग क्रमांक ३ मध्ये मानपाडा, मनोरमानगर, आझादनगर हा परिसर येतो. येथून माजी महापौर मीनाक्षी शिंदे या निवडून येतात. याच प्रभागातून ज्येष्ठ नगरसेवक संजय भोईर यांचे बंधू भूषण हे गेल्या वेळी निवडून आले. शेजारच्या बाळकुम प्रभागातून संजय भोईर, त्यांची पत्नी उषा आणि त्यांचे वडील देवराम हे निवडून येतात. भोईर कुटुंबीय आणि मीनाक्षी शिंदे यांच्यात मतभेद असल्याची बाब अनेकदा समोर आली आहे. यातूनच भोईर यांच्या जागी स्थानिक पदाधिकारी किवा कार्यकर्त्यांला संधी देण्याची मागणी मीनाक्षी शिंदे यांच्या समर्थकांकडून होत आहे. याबाबत काही दिवसांपूर्वी त्यांचे समर्थक असलेले शाखाप्रमुख विक्रांत वायचळ यांनीही उघडपणे भूमिका मांडली होती. यामुळेच पक्षविरोधी कार्य केल्याचा ठपका ठेवत शिवसेना शिंदे गट पक्षाचे सचिव संजय मोरे यांनी वायचळ यांना शाखाप्रमुख पदावरून दूर केले . यातून शिंदे नाराज होत्या. यामुळे त्यांनी पदाचा राजीनामा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिला. हा पक्षांतर्गत वाद असून, यातून श्रेष्ठी मार्ग काढतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान मीनाक्षी शिंदे या आपल्या मुलीला राजकारणात सक्रिय करण्याच्या प्रयत्नात असून तिला पालिका निवडणुकीत उतरवण्याची तयारी सुरु आहे . मुलीला तिकीट मिळावे यासाठी स्थानिक पदाधिकारी किवा कार्यकर्त्यांला संधी देण्याची मागणी करण्यात येत असून आपल्या मुलीच्या तिकिटासाठी शिंदे या पक्ष श्रेष्ठीवर दबाव टाकत आहेत अशी जोरदार चर्चा सुरु झाली आहे .